Monday, October 18, 2021

गुड न्यूज: महाराष्ट्रातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात!; ‘असा’ आहे ताजा अहवाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे राज्याचा साप्ताहिक सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट २.४४ टक्के इतका खाली आला आहे.

त्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोल्हापूर, रत्नागिरीतून समाधानकारक बातमी आली असून सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील करोना स्थिती अजूनही चिंता वाढवणारी आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोविड संसर्गाची सद्यस्थिती आणि कोविड प्रतिबंधक

लसीकरण मोहिमेचा विस्तृत तपशील सादर करण्यात आला. यात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दिलासा देणारे चित्र पुढे आले आहे. राज्यात अनलॉक प्रक्रिये अंतर्गत निर्बंध शिथील करण्यात आले असताना ताज्या अहवालातील पॉझिटिव्ह माहिती कोविड विरोधी लढ्याला बळ देणारी अशीच आहे.

राज्य नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन या अहवालाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

१. कोविडची दुसरी लाट: कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आली आहे.
२. शून्य रुग्ण – नंदूरबार जिल्हयात सध्या एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.

३. दहापेक्षा कमी रुग्ण – राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.
४. शंभरपेक्षा कमी रुग्ण – राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.

५. सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे- सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.
६. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.
७. राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरीतील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!