Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच कार्यालयात कोंडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विविध मागण्यासाठी उंदीरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांना बाहेरून कुलूप लावून कोंडून घेतले.

अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले.ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके व योगीता निपुंगे यांनी उंदीरगाव ग्रामपंचायतीत कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नाही.

तसेच केलेले काम हे चांगल्या दर्जाचे नाही. महिन्यापासून ग्रामस्थांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. चार महिने मशीन बसविले पण सुरू केले नाही. सार्वजनिक शौचालय 5 महिन्यांपासून बांधूनही नागरिकांना वापरण्यासाठी खुले केले नाही. या मागण्यांसाठी कार्यालयास टाळे ठोकले.

यावेळी सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके हे लिपिक कार्यालयात असताना कोंडले गेले.अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले.

या आंदोलनप्रसंगी दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक, मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!