Saturday, October 23, 2021

करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ;या विद्यापीठाचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने ज्या विद्यार्थ्यांनी करोनामुळे आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात आले असल्याचे विद्यापिठातर्फे सांगण्यात आले आहे.

सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फी मध्ये सवलत देण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोबत सादर केला होता.

त्यानंतर कुलगुरूंनी समितीचा अहवाल स्वीकारला आणि शिफारसी मंजूर केल्या. त्यानुसार, विद्यापिठाने विविध अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले.दरम्यान, करोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत त्यांना फीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही फी मध्ये कपात केवळ

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी लागू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे. वसतिगृह/ निवास शुल्क तेव्हाच लागू होईल जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतील.

ताज्या बातम्या

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...
error: Content is protected !!