Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील ‘या’ प्रकारामुळं अभ्यासकांनाही धक्का

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कीड रोग नाशक म्हणून वापर करण्यात येणाऱ्या कडुलिंबावरच एका किडीने हल्ला केला आहे. एक प्रकारच्या हुमणीच्या जीवन साखळीतील हे भुंगेरे कडुलिंबाचा पाला खात असल्याने झाड वाळून जात असल्याचे प्रकार आढळून आले आहेत.

निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.पिकांवर पडणाऱ्या अनेक प्रकारच्या कीड रोगावर कडुलिंबाचे औषध फवारले जाते. कडुनिंबाचा पाला माणसांमध्येही अनेक रोगांसाठी उपयुक्त ठरतो. मात्र, सध्या या कडुलिंबाच्या झाडालाच किडीने ग्रासले आहे.

नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी कडुलिंबाची झाडे वाळून जात असल्याचे आढळून आले. असे का होत आहे, यासाठी निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहामार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले.यासंबंधी निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी सांगितले, ‘हुमणीच्या भुंगेर्‍यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढले आहे.

त्याचा प्रादुर्भाव कडुलिंब वृक्षांवर दिसून आला. ठिकठिकाणी कडुलिंबांचे वृक्ष वाळून जात आहेत. हुमणी ही शेती फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी अळी आहे. देशात हुमणीच्या सुमारे ३०० प्रजाती असून त्यातील लिकोफोलिस आणि होलोट्रॅकिया अशा दोन प्रजाती आपल्याकडे आढळतात.

हुमणीची जीवनसाखळी अंडी, अळी, कोष व कीटक या अवस्थांमधून पूर्ण होते. अळी अवस्थेत असताना हुमणी जमिनीत राहून पिकांची मुळे खातो. जून-जुलै मध्ये त्याचे किटकात रुपांतर झाल्यावर भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. ते थव्याने कडुलिंब व बाभूळ या झाडांवर रात्री हल्ला करतात. हे भुंगेरे सुमारे शंभर दिवस जगतात.

यावर्षी त्यांचे प्रमाण अधिक असल्याने जादा नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यावर कोणतीही रासायनिक औषधे वापरून या किडीचे नियंत्रण करण्यापेक्षा रुईच्या चिकाची फवारणी करावी. पिकांची फेरपालट करून हुमणी नियंत्रणात आणता येते,’ असेही सातपुते यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!