Wednesday, October 27, 2021

नाकावाटे कोरोना प्रतिबंधक लस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अमेरिका-इंग्लंडसारख्या देशांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातही डेल्टा व्हेरिएन्टच्या अनेक नव्या रुग्णांची भर पडत आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे विषाणू नाक आणि घशामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग करत आहे.

त्यावर उपाय म्हणून इंट्रा-नेझल स्प्रेद्वारे लस दिल्यास ती नाक व घशातील विषाणूविरोधात प्रभावीपणे काम करत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या सर्वात प्रभावी उपाय म्हणून संपूर्ण जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे; मात्र लसीकरणानंतरही अनेक देशांमध्ये डेल्टा आणि डेल्टा

प्लस व्हेरिएन्टमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हे दोन्ही व्हेरिएन्ट नाक आणि घशामध्ये संसर्ग करतात. सध्या हातावरील स्नायूत दिल्या जाणाऱ्या लशीचा प्रभाव नाक आणि घशातील विषाणूवर कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण झालेली

व्यक्तीही निरोगी व्यक्तीला संसर्ग करत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस इन्ट्रा-नेझल स्वरूपात दिल्यास नाक व घशातील विषाणूवर प्रभावीपणे मात करत असल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका म्हणजेच भारतातील कोविशिल्ड या लशीचा नाकावाटे

दिला जाणारा स्प्रे तयार करून त्याच्या प्राण्यांवर चाचण्या घेण्यात आल्या. नाकावाटे दिलेली लस स्नायूत इंजेक्शनवाटे दिलेल्या लशीपेक्षा अधिक सक्षमपणे कोविड विषाणूवर मात करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच नाकावाटे दिलेल्या लशीमुळे कोणतेही दुष्परिणाम (ताप, सर्दी किंवा अंगदुखी) जाणवले नाहीत.

इन्ट्रा-नेझल स्प्रेद्वारे दिलेली लस नाक-घशामध्ये वेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतात.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!