Saturday, October 23, 2021

गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं अन्…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन महिला आल्या होत्या. त्यांनी शरीरात सोनं लपवलं होतं. या तीनही महिलांना अटक करण्यात एनसीबीला यश आलं आहे. विशेष म्हणजे महिलांनी गुप्तांगात सोन्याच्या पुड्या लपवल्या होत्या. या तीनही महिला केनियाच्या नागरिक आहेत.

एनसीबीने कारवाई नेमकी कशी केली?

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. यावेळी या तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता तस्करीचा प्रकार उघडकीस आला. सोनं तस्करी ही कारवाई कस्टम विभागाशी संबंधित असल्याने या तीन महिलांना कस्टमच्या हवाली करण्यात आलं आहे.

झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना काही महिला परदेशातून ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार समीर वानखेडे आणि त्यांचं पथक विमानतळावर पाळत ठेवून होतं. दोहा येथून मुंबईत येणाऱ्या विमानात या व्यक्ती असल्याची माहिती होती. त्यानुसार तीन महिला आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

अटक केल्यानंतर महिलांना त्रास होत असल्याचं सांगितलं

आरोपी महिलांना मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर या महिलांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. यावेळी त्या महिलांनी खरी परिस्थिती सांगितली.

डॉक्टरांच्या मदतीने लपवलेल्या वस्तू काढण्यात आल्या

या महिलांनी त्यांच्या गुप्तांगात वस्तू लपवली असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या मदतीने त्या लपवलेल्या वस्तू काढण्यात आल्या. काढण्यात आलेली वस्तू हे सोनं होत. त्या तीन महिलांकडून 938 ग्राम सोनं जप्त करण्यात आलं आहे. 13 पाकिटात सोन्याचे 17 तुकडे लावण्यात आले होते. हे तुकडे 20 ग्राम ते 100 ग्रामचे होते.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!