Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात मांडूळ सापाची तस्करी; तब्बल ‘इतक्या’ लाखांना ठरला होता सौदा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:औषधी असल्याने लाखो रुपयांना विक्री होणाऱ्या मांडूळ सापाची तस्करी वनविभागाने कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे उघडकीस आणली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला आहे. सुमारे सव्वा किलो वजनाच्या या सापाचा तस्करांनी ७ लाख रुपयांचा सौदा केला होता.श्रीगोंदा येथील वनसंरक्षक रमेश देवखिळे यांना सर्पमित्रांकडून या तस्करीसंबंधी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून विशाल सुर्यभान धनवटे (वय २५, रा. नवसरवाडी ता. कर्जत) याला पकडले.

त्याचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. १६ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असून सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती देवकुळे यांना मिळाली होती. त्यांनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले,

दीपक गवारी, वनमजूर किसन नजन यांनी खासगी गाडीने साध्या वेशात नवसरवाडी येथे जाऊन सापळा लावला. बनावट ग्राहक संशयित व्यक्तीकडे पाठवण्यात आले. तेथे चौघे एक मांडूळ विकणार असल्याची माहिती मिळाली. बनावट ग्राहकाने त्यांच्याशी खरेदीसंबंधी चर्चा केली. त्यांनी हा साप सात लाख रुपयांना विकणार असल्याचे सांगितले.

बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे होकार दिला. मग त्या चौघांपैकी दोघे घरी साप आणण्यासाठी गेले आणि तो घेऊन आले. तोपर्यंत वन अधिकारीही तेथे आले. आपण अडकत असल्याचे पाहून तिघे पळून गेले. विशाल धनवटे मात्र हाती लागला. त्याच्याकडून साप जप्त करण्यात आला. या सापाचे वजन १.१५ किलो भरले.

तो जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!