Saturday, October 23, 2021

नगर जिल्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून;कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कामानिमित्त परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यात संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे  गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी बाली बाळू निकम हीने वांबोरी दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपी पती डोंगरात जाऊन लपून बसला होता. त्याला पोलिसांनी स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने ताब्यात घेतले.तक्रारीत म्हटले, मयत अलका वसंत शिंदे (वय 45) ही आपला पती वसंत लक्ष्मण शिंदे रा. गुंजाळे, ता. राहुरी याच्याकडे मला मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे तालुका श्रीगोंदा येथे जायचे आहे.

परंतु पती वसंत याने तिला तिकडे जाण्यास विरोध केला. त्यामुळे पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात त्याने अलका हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार करून डोक्यात टणक वस्तुने जबर मारहाण करण्यात आल्याने त्यात अलका हिचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान गुरुवारी सकाळी सात वाजता संशयित आरोपी वसंत याने मुलीला जाऊन सांगितले की, तुझी आई झोपलेली आहे, तिला जाऊन बघ, असे सांगून आरोपी डोंगराकडे पळत गेला. त्यानंतर आईचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मयताची मुलगी बाली हिने तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागीय उपाधीक्षक संदीप मिटके , राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ , पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र डावखर,

वांबोरीचे पोलीस हवालदार चंद्रकांत बराटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परीस्थितीची पाहणी केली व डोंगराच्या दिशेने पळून जाऊन लपून बसलेला संशयित आरोपीचा स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने शोध घेऊन ताब्यात घेतले व गुन्ह्याचा उलगडा झाला.

दरम्यान, मृतदेह वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पतीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!