Wednesday, October 27, 2021

वरचे सरकार आमचं आहे, लवकरच सगळं बाहेर येईल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आजपासून जनआशीर्वाद यात्रेला धडाक्यात सुरुवात केली. विमानतळावर उतरल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.  त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.

त्यानंतर नारायण राणे मुंबई पिंजून काढत आहेत. यादरम्यान त्यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे. तसेच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.मुंबई महापालिका हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कुठून कसे पैसे येतात हे मला माहिती आहे. यांनी इंजेक्शन खरेदीत 12 टक्के घेतले .

भ्रष्टाचार उघड करा असे त्यांनी सांगावे, उद्यापासून सुरू करतो”, असा इशारा राणेंनी यावेळेस दिला. राणे लालबागमध्ये बोलत होते.  अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सीएमना प्रश्न विचारला तर यांना काही माहिती नाही. सलून उघडून बसला आहेस का? यावेळेला महापालिकेत परिवर्तन झाले पाहिजे.

अनेक वाझे निर्माण झालेत. कुंपणच शेत खातंय. आपल्या लोकांना आता यूपीत जावून नोकरी करायला जाण्याची वेळ येवू नये. वरचे सरकार आमचे आहे. लवकरच सगळं बाहेर येईल. जास्त हालचाल करू नका, नाड्या आमच्या हातात आहेत, असं म्हणत राणेंनी थेट इशारा दिला आहे.

“मी आतापर्यंत अनेक पदे सांभाळली. आता हे शेवटचे पद आलंय माझ्याकडं. या विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. लोकांचा प्रतिसाद पाहून अनेकांच्या पोटात दुखतंय. बाळासाहेबांच्या स्मारकावरही गेलो. मी जो आहे तो बाळासाहेबांमुळं आहे. शुभेच्छा द्यायला मनाचा मोठेपणा लागतो.

साहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असूनही स्मारकाचे सुशोभिकरण करायला पैसे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. ते लालबागमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!