Wednesday, October 27, 2021

आनंदाची बातमी:महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात.भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय.

2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक. या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. भूविकास बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली.1997 पासून बँक आर्थिक अडचणीत आली. कर्जवाटप थांबल्यानं ‘नाबार्ड’ने अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या.

अखेर 86 वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.
निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले.

अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!