Monday, October 25, 2021

पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा तर नगर जिल्ह्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दोन ते तीन आठवडे दडी मारल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे.  भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार

ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील २४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतही पुढच्या काही तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

गेल्या ३ दिवसांपासून विदर्भातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यानं पिक सुकू लागली होती. तसेच ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र, वेळेवर पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडत असल्याचने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

त्यामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.दरम्यान, महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!