Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यात करोना वाढत असूनही हे खासदार म्हणतात, चिंता नको, कारण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधितांचे आकडे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी योग्यच आहे,’ असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

करोनासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा, लसीकरणाचे नियोजन यासंबंधी डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘मागील काही काळात नगर जिल्ह्यात जवळपास एक लाख तीस हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या,

त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्याखालोखाल नगर जिल्ह्यात या चाचण्या झाल्या आहेत. ज्या धुळे जिल्ह्याला करोनामुक्त म्हटले जाते, तिथे केवळ आठ हजार चाचण्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासनाने जास्तीत जास्त चाचण्या करून बाधितांना विलगीकरणात पाठविण्याचे धोरण राबवले आहे.

त्यामुळे सध्या कागदावर आकडे वाढलेले दिसत असले तरी तो प्रशासनाच्या सकारात्मक कृतीचे निदर्शक आहे. भविष्यात साथ नियंत्रणासाठी याचा उपयोग होणार आहे. जेवढे आपण अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांना बरे करू, तेवढी तिसरी लाट येण्याची शक्यता कमी राहील.’

लसीकरणाच्या गोंधळाबद्दल ते म्हणाले, ‘लसीकरणासंबंधी आतापर्यंत येथे ठोस नियोजन नव्हते. अधिकारी आपल्या पद्धतीने नियोजन करीत होते. आता यासाठी सूत्र ठरवून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात लस मिळणार नाही. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच त्यांनी घ्यायची आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!