Friday, October 22, 2021

यावेळेत नगरमध्ये वाहनांना बंदी हे कारण आले समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर शहरात आता वाहनांना काही काळ बंदी घालण्यात आली आहे. सहा तास वाहणे शहरात आणता येणार नाहीत.25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत रात्री 12 ते सकाळी सहा यावेळेत सर्व वाहनांना नगर शहरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. जाणून घेऊया सविस्तर.शहरात उड्डाणपुलाचे काम सुरु आहे.

या कामाच्या अनुशंघाने सदर निर्णय घेण्यात आला आहे.कामासाठी याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली. नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डापुलाचे काम प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने सक्कर चौक ते चांदणी चौका दरम्यान लाँचिंग गर्डरचे काम करायचे आहे.

उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता. हे काम चालू असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात येणार आहे.नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास -शासकीय दूध डेअरी चौक -विळद बायपास -निंबळक बायपास -कांदा मार्केट रोड -केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहेत.

पुण्याकडून मनमाड , औरंगाबादकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास – निंबळक-विळद-शासकिय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे.बीड, जामखेड, पाथर्डीकडे जाणारे-येणारी अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. पुण्याकडून येणार्‍या वाहनांकरिता केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, नगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलला आहे.

यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पीटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्लीगेट-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस,

कोठी चौक, नेप्तीनाका येथे दिल्ली गेटकडे येणारे रोडवर व पत्रकार चौक येथे अप्पू हत्ती चौकाकडे जाणारे रोडवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील इतक्या उंचीचे हाईट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!