Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेस धमकी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील अंगणवाडी सेविका सौ. चहाबाई पांडुरंग भांगरे यांना धमकी, मारहाण केल्याप्रकरणी पिंपळदरावाडी येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध राजूर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भांगरे याने अमृत आहार योजनेचे आलेले पैसे न देता व बहीण सरपंच असताना याच बहिणीच्या नावाने खोट्या सह्या करून पैसे काढत असून मला नेहमी त्रास देऊन मारहाण करतो. या इसमापासून माझ्या जिविताला धोका असून त्याने मला अंगणवाडीत येऊन मारहाण केली.

त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद राजूर पोलिसांकडे पिंपळदरावाडी येथील अंगणवाडी सेविका सौ. चहाबाई पांडुरंग भांगरे यांनी दिली.साहेबराव भांगरे याची बहीण अंजनाबाई भांगरे या सरपंच आहेत. त्या टाकेदमध्ये राहतात. चेकवर सह्या आणण्यासाठी आम्हाला टाकेदला जावे लागते.

आठ महिने झाले या व्यक्तीने चेकबुक ताब्यात घेतले. शेवटी मी मंगळसूत्र गहाण ठेवून वीस हजार रुपये काढून गरोदर माता स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेचा आहार दिला. ही व्यक्ती सतत अंगणवाडीत येऊन दमबाजी करते तसेच मला राजीनामा देण्यास सांगते.

दि. 13 ऑगस्ट रोजी अंगणवाडीत येऊन मला मारहाण केली. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा बोलावली तर तो पळून गेला. या व्यक्तिपासून माझ्या जिवितास धोका असून मला अंगणवाडीत येऊन दमबाजी करतो असे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध

भारतीय दंड संहिता कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल डगळे करीत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!