Friday, October 22, 2021

गोदावरीत 1009 क्युसेकने विसर्ग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसाचे काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे आगमन झाले. हा पाऊस खरिपाला जीवदान ठरणारा असला तरी धरणातील साठे वाढविण्यासाठी धुव्वाधार पावसाची गरज आहे.

नाशिक परिसरात व नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने त्यातून काल सायंकाळी 6 वाजता गोदावरी नदीत जायकवाडीच्या दिशेने 1009 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. पालखेड धरणातून काल दुपारी 400 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.

हे पाणी रात्रीतून नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होईल.त्यामुळे काल सकाळी गोदावरीतील विसर्ग 1500 क्युसेक इतका होऊ शकतो. गंगापूर धरण परिसरात काल दिवसभरात सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत भिंतीजवळ 25 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 30 मिमी तर त्र्यंबकला 13 मिमी पावसाची नोंद झाली.

दिवसभरात गंगापूर मध्ये 62 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे गंगापूरचा साठा काल सायंकाळी 6 वाजता 83.16 टक्के इतका झाला होता. 5630 क्षमतेच्या या धरणात 4682 दलघफू इतका साठा तयार झाला होता.काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत गंगापूरला 35 मिमी पावसाची नोंद झाली.

मागील 24 तासांत गंगापूर मध्ये 106 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे गंगापूरचा साठा काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत 82.03 टक्क्यावंरुन 83.16 टक्क्यांवर पोहचला आहे. गौतमी 27 मिमी, कश्यपीला 13 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी धरणात 5 दलघफू तर गौतमीत 14 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

काल दिवसभर काश्यपीला 12 मिमी तर गौतमीला 13 मिमी पावसाची नोंद झाली. काश्यपी 57.34 टक्के तर गौतमी 68.68 टक्के भरले होते.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!