Monday, October 25, 2021

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात.

भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक. या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. भूविकास बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली.1997 पासून बँक आर्थिक अडचणीत आली.

कर्जवाटप थांबल्यानं ‘नाबार्ड’ने अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या. अखेर 86 वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.

निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!