Monday, October 25, 2021

खा विखे म्हणतात त्यामुळे नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधितांचे आकडे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी योग्यच आहे,’ असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

करोनासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा, लसीकरणाचे नियोजन यासंबंधी डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘मागील काही काळात नगर जिल्ह्यात जवळपास एक लाख तीस हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

पुणे जिल्ह्याखालोखाल नगर जिल्ह्यात या चाचण्या झाल्या आहेत. ज्या धुळे जिल्ह्याला करोनामुक्त म्हटले जाते, तिथे केवळ आठ हजार चाचण्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासनाने जास्तीत जास्त चाचण्या करून बाधितांना विलगीकरणात पाठविण्याचे धोरण राबवले आहे. त्यामुळे सध्या कागदावर आकडे वाढलेले दिसत असले तरी तो प्रशासनाच्या सकारात्मक कृतीचे निदर्शक आहे.

भविष्यात साथ नियंत्रणासाठी याचा उपयोग होणार आहे. जेवढे आपण अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांना बरे करू, तेवढी तिसरी लाट येण्याची शक्यता कमी राहील.लशीचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल केंद्र सरकारकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. युरोपातील देशांशी तुलना केली तर दररोज एका संपूर्ण देशाचे लसीकरण होईल, एवढी लस आपल्याकडे उपलब्ध करून दिली जात आहे.

आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर हे काम किती आव्हानात्मक आहे, हे लक्षात येते. तरीही पुढील महिन्यात पुरवठा आणखी वाढण्यास मदत होणार आहे. सध्याच्या व्यवस्थेत काही सुधारणा करणे अपेक्षित होते, त्या आम्ही केल्या आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत यासंबंधी नक्कीच सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येतील,’ असेही विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!