Monday, October 18, 2021

नगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असल्याचं सांगितलं. शिवाय राज्यातील निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे थोडा दिसाला मिळाल आहे. पण अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. राज्यातील तीन जिल्हे अद्यापही कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत.

राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दैनंदिन प्रकरणं वाढतच आहेत. अहमदनगर , सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. इथं दैनंदिन रुग्णांची संख्या 600 च्या वरच आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार अहमदगनरमध्ये सर्वाधिक 778 नवे रुग्ण सापडले आहेत. यामागोमाग सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात अनुक्रमे 707 आणि 625 रुग्ण आहेत. मृत्यूचा आकडा पाहता साताऱ्यात सर्वाधिक 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नगर, सोलापुरात अनुक्रमे 11 आणि 5 रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे.

या तीन जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरोना थैमान घालतो आहे. याचा अर्थ महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे निर्बंध शिथील झाले म्हणून आता कोरोना नाहीच असं समजून बेजबाबदारपणे वागणं चांगलंच महागात पडू शकतं.

कोरोना नियमांचं कठोर पालन करायलाच हवं. नाहीतर या तीन जिल्ह्यांतील कोरोना कधी पुन्हा इतर जिल्ह्यांतही हातपाय पसरेल हे सांगू शकत नाही.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!