Friday, October 22, 2021

अण्णा हजारेंचा इशारा पुन्हा मोठ्या जनआंदोलनासाठी सज्ज रहा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सरकार कोणत्याही पक्षाचे असो ,मात्र जनहिताच्या प्रश्नाकडे सरकार जर डोळेझाक करत असेल तर त्याला जाणीव करून देण्यासाठी पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल, यासाठी सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या समविचारी कार्यकर्त्यांनी संघटन उभे करत सज्ज रहावे,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

राळेगणसिद्धी येथे राज्यातील निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त व जिल्हा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.18) राळेगणसिद्धी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, यावर कार्यकर्त्यांनी व्यापक समाजहिताच्यादृष्टीने योगदान देण्याचे आवाहन हजारे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकायुक्त होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यासाठी एक संयुक्त मसुदा समिती कार्यरत आहे. मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी केवळ एक दोन बैठका बाकी आहेत. हा कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलनाच्या तयारीत राहण्याचे आवाहन यावेळी अण्णा हजारयांनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, सरकारवर दबाव गट निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हास्तर व तालुकास्तरीय संघटन बांधणीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधी काही कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!