Wednesday, October 27, 2021

आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पीएम किसान सन्मान 2000 हजार रूपये

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान मोदी यांनी दहा दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम जारी केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार ही योजना चालवत आहे.

या योजनेअंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंत लागवडयोग्य जमीन असलेल्या छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देते. परंतु असे काही शेतकरी आहेत ज्यांच्याबद्दल सरकारने स्पष्ट केले आहे, की त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील सूचना जारी केल्या आहेत.या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही . सर्व संस्थात्मक जमीनधारक शेतकरी शेतकरी, संवैधानिक पदांचे माजी आणि वर्तमान धारक माजी आणि विद्यमान मंत्री / राज्यमंत्री आणि लोकसभा / राज्यसभा /

राज्य विधानसभा / राज्य विधान परिषदांचे माजी / विद्यमान सदस्य, महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतीचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष केंद्र/राज्य सरकारची मंत्रालये / कार्यालये / विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय युनिट्‌स, केंद्रीय किंवा राज्य सार्वजनिक उपक्रम आणि संलग्न कार्यालये /

स्वायत्त संस्था आणि सरकार अंतर्गत स्थानिक संस्थांचे नियमित कर्मचारी, सेवेत असलेले किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु, मल्टी-टास्किंग कर्मचारी, चतुर्थ श्रेणी आणि ड गटातील कर्मचाऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल. निवृत्त निवृत्तिवेतनधारक ज्यांचे

 मासिक पेन्शन 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांना या योजनेची रक्कम मिळणार नाही गेल्या मूल्यांकन वर्षात आयकर भरणाऱ्या सर्व व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील. डॉक्‍टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्‍ट यांसारखे

व्यावसायिक नोंदणीकृत आहेत आणि व्यावसायिक संस्थांकडे सराव करतात, अशा व्यक्तींनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!