Wednesday, October 27, 2021

नगरमध्ये उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; इतके दिवस बदल तर हा नविन मार्ग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : उड्डाणपुलाच्या कामासाठी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत रात्री 12 ते पहाटे सहा या वेळेत सर्व वाहनांना नगर शहरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.

अशी असणार वाहतूक व्यवस्था :नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास-शासकीय दूध डेअरी चौक-विळद बायपास-निंबळक बायपास-कांदा मार्केट रोड-केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहेत.

पुण्याकडून मनमाड, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास- निंबळक-विळद-शासकिय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच बीड, जामखेड, पाथर्डीकडे होणारी अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.

पुण्याकडून येणार्‍या वाहनांकरिता केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, नगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलण्यात आला आहे.

यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पिटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्ली दरवाजा-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

बॅरीअर बसविणार :
त्याचप्रमाणे शहरातून अवजड वाहतूक होऊ नये, म्हणून यश पॅलेस, कोठी चौक, नेप्तीनाका येथे तसेच दिल्ली दरवाजाकडील रस्त्यावर, पत्रकार चौक, अप्पू हत्ती चौक येथील रस्त्यांवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील, असे व्हाइट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!