Monday, October 18, 2021

सोन्यामध्ये तेजी येऊनही 9000 रुपयांनी कमी आहेत दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्यात 0.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किंमतीत 0.19 टक्क्यांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याचे दर आज वाढलेले असूनही रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 9000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सराफा बाजारात सोन्याचे दर 47,286 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात जवळपास 9000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर 0.25 टक्क्यांच्या वाढीनंतर 47,286 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर आज चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर आज 0.19 टक्क्यांनी वाढून 62,251 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!