Monday, October 25, 2021

दानवे म्हणाले माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राजकिय नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात माञ मि सतत लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखं वागतो म्हणून सातत्याने ४० वर्ष एकही निवडणूक न हारता निवडून येतो असं सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या सतत विजयी होण्याचं रहस्य उघड केलंय.

आज भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालन्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा जालना जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर ते आयोजित कार्यक्रमांत बोलत होते. निवडून आल्यानंतर अनेक नेत्यांच्या वागणुकीत आणि राहणीमानात बदल होतो,

असं सांगत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी शुक्लकाष्ठ मागे लागू नये म्हणून हातात कुणाच्यातरी सांगण्यावरून हिरा, पन्ना आणि निलम या अंगठ्या घातल्या पण तरीही त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्याचं दानवे म्हणाले.भागवत कराड मंत्रीमंडळात नवीन चेहरा असल्यानं त्यांच्या मांडव

परतण्याचा कार्यक्रम सुरूय असं सांगत मि केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालोय असं सांगत माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नाही असं सांगत दानवे यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. मला कोळसा खातं मिळाल्यानं सकाळीच उठून मि तोंडावरून हात फिरवून गालाला

तोंड काळं तर झालं नाही ना हे गालावरून हात फिरवून पाहतो असं सांगत मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत नसल्याचं ठासवून सांगितलं.माझं मंत्रीपद जाणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्यानंतर अनेकांना गुदगुल्या झाल्याचां टोला देखील त्यांनी विरोधकांना हाणला.

लोकांनी सातत्याने ३५ वर्ष निवडून दिलं नसतं तर माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.२०१९ च्या निवडणुकीत मि साडेतीन लाख मतांनी निवडून आलो असं सांगत त्यांनी निकालाच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र घेण्याआधी बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी

आपल्याला कसे चिमटे काढले याचा किस्सा सांगितला तसेच आयुष्यात अशा कहाण्या खूप झाल्यात असं सांगत भाजप नेते बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टोलेबाजी करत त्यांचा समाचार घेतला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!