Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू; जाणून घ्या भंडारदरा,मुळा व इतर धरणाचा साठा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक वाढली आहे. भंडारदरा धरणातून अजूनही ८३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. सध्या निळवंडे धरणातूही ७०० क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी वाहती आहे.

दोन्ही मोठ्या धरणांत पाण्याची आवक:

सध्या राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. पण, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते. गुरुवारी मात्र हे चित्र बदललं. गुरुवारी भंडारदरा व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची पुन्हा आवक वाढली आहे. कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग १७५३ क्युसेक होता. त्यामुळे धरणात ६८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आलं आहे.

नगरमध्ये चिखलाचं साम्राज्य:

नगर शहरात गुरुवारी सकाळी हलक्या सरी आल्या. त्यानंतर मात्र पाऊस झाला नाही. फक्त आकाश अभ्राच्छादित होतं, त्यामुळे सूर्यदर्शन झालं नाही. शहरात दोन दिवसांच्या पावसानं रस्त्यांची दाणादाण डाली आहे. सर्व रस्त्यांवर चिखल व पाण्याचं साम्राज्य आहे.

नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस:

ऑगस्टनंतर राज्यात परतीचा पाऊस सुरू होतो. त्यावेळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस नसतो. त्यामुळे धरणं भरण्यासाठी हाच महिना आहे. यंदा अद्याप नाशिक जिल्ह्यातील धरणेही भरलेली नाहीत. कालही नाशिक जिल्ह्यात विशेष पाऊस पडलेला नाही. काल नाशिकला २६, त्रिंबकेश्वर १९

तर इगतपुरी येथे ४३ मिलिमीटर पाऊस झाला. दरवर्षीप्रमाणे गोदावरीतून अजूनही फारसं पाणी वाहिलेलं नाही. संपूर्ण कोपरगाव तालुका, तसेच राहाता तालुक्याचं सिंचन गोदावरीवर अवलंबून आहे. त्यामुले या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे डोळे नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाकडे लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यांतील गंगापूर, दारणा, कडवा, पालखेड, मुकणे या धरणांतील पाणीसाठा अद्याप ८५ टक्क्यांच्या आतच आहे. ही धरणं भरण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. कारण त्याशिवाय गोदावरी नदी वाहती होत नाही. हेच पाणी पुढे जायकवाडीत जात असतं.

भंडारदराच्या पाणलोटात पावसाला जोर:

भंडारदरा धरणात गेल्या २४ तासांत १२५ दशलक्ष घनफूट पाणी आलं आहे. धरणाचा पाणीसाठा ९ हजार ७५७ दशलक्ष घनफूट म्हणजे ८८.३८ दशलक्ष घनफूट झाला आहे. पावसाचा जोर आजही कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

मुळाच्या पाणलोटातही पाऊस:

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र गड परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग आज सकाळी कालच्या तुलनेत दुप्पट म्हणजे १७५३ क्युसेक होता. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात आता १८ हजार ९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे मुळा धरण ६९.५८ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे गुरुवारी सकाळी ४९, रतनवाडी येथे ३९, तर पांजरे येथे ३५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. भंडारदरा धरण परिसरात २९ मिलिमीटर, तर मुळा धरणाच्या परिसरातही ६ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

मुळा धरणाच्या कालव्यांतून ५० क्युसेकने पाणी सोडण्यात आलं आहे. निळवंडे धरणाच्या परिसरातही २२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

निळवंडे धरणात ६६.४३ टक्के पाणीसाठा:

सध्या भंडारदरा धरणातून ८३० क्युसेकनं सोडण्यात आलेलं पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. निळवंडेतूनही ५०० क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ नाही. धरणात ६६.४३ टक्के पाणी आहे. आढळा (४९.२४), सीना (४४.२२), खैरी (१४.६२), विसापूर (३.३६) या धरणांतील पाणीसाठ्यात बदल झालेला नाही.

जायकवाडीत ५७.७९ टक्के पाणीसाठा:

मराठवाड्यातील महत्त्वाच्या व मोठ्या असलेल्या धरणाच्या परिसरातही काल १० मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. सध्या धरणात ५७.७९ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील ४०.७७ टक्के साठा उपयुक्त आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!