Monday, October 25, 2021

पालकांनो सावधान! कोरोनानंतर हे संकट; मुलांमधील ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : डेल्टा व्हेरिएंटचा  धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. लहान मुलांनाही याचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशात आता लहान मुलांवर आणखी एक संकट ओढावणार आहे. कोरोनानंतर आता लहान मुलांना एक्युट प्लेसिड म्येलिटिस  या आजाराचा धोका आहे.  एएफएमबाबत पालक आणि डॉक्टरांना अलर्ट करण्यात आलं आहे.

पुढील चार महिन्यांत एक्युट प्लेसिड म्येलिटिस थैमान घालणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन याबाबत सावध केलं आहे. याबाबत एक रिलीज जारी करून सविस्तर माहिती दिली आहे.

काय आहे एक्युट प्लेसिड म्येलिटिस
एएफएम हा पोलिओसारखा आजार आहे. गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामुळे विशेषतः पाठीच्या मणक्याजवळील क्षेत्र ज्याला ग्रे मॅटर म्हटलं जातं, त्यावर परिणाम होतो. यामुळे शरीरातील मांसपेशी कमजोर होतात. अमेरिकेत 2014, 2016 आणि 2018  साली या आजाराची बरीच प्रकरणं दिसून आली होती.

एक्युट प्लेसिड म्येलिटिसची लक्षणं
शरीरात कमजोरी
श्वास घ्यायला त्रास
ताप
घसा आणि पाठीत वेदना

2014 नंतर दर दोन वर्षे या आजारामुळे पॅरालिसिसची अनेक प्रकरणं समोर आली आहे. 2018 मध्ये याचा प्रकोप झाला होता. 42 राज्यांमध्ये 239  रुग्ण सापडले होते. त्यापैकी जवळपास 95 टक्के लहान मुलं होती, अशी माहिती सीडीसीने दिली आहे.

या आजारावर कोणतेही उपचार नाही. सुरुवातीच्या लक्षणांनुसार उपचार केल्यास परिणाम दिसून येतो.  त्यामुळे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणं शक्य होईल. त्यामुळे वरीलपैकी लक्षणं दिसल्यास विशेषत: ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये असे रुग्ण आढळल्यास त्यांना एएफएमचे संशयित रुग्ण समजून तात्काळ रुग्णालयात दाखव करावं, असा सल्ला सीडीसीने दिला आहे.

कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगमुळे एएफएम रुग्णांना उपचार मिळण्यात उशीर होण्याची तसंच प्रकरणं वाढण्याची आणि याचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे आपात्कालीन विभागीतल बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी तयार राहावं आणि रुग्णांना तात्काळ रुग्णालयात भरती करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!