Monday, October 18, 2021

गोपीनाथ मुंडे नसते तर पारावर हरिपाठ करत बसलो असतो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेड्याच्या पारावर बसून हरिपाठ म्हणत बसलो असतो, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे उद्गार काढले.

गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही मला आमदार, खासदार केलं नसतं तर मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो? मी कोयला मंत्री झालो असतो? मी काय ग्राहक संरक्षण मंत्री झालो असतो? तुम्ही निवडून दिलं नसतं आणि गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर

जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरिपाठ म्हणत बसलो असतो. मी कलकत्ता, लखनऊ, दिल्ली या कितीही गोष्टी करत असलो, कितीही वर गेलो तरी माझ्या मतदारांना मी विसरणार नाही, अशी ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली.

आमची दोरी तुमच्या हाती
पतंग आकाशात असते पण जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात तिची दोरी असते. पतंगाला दिशा देण्याचं काम जमिनीवरचा माणूस करतो. जोपर्यंत जमिनीवरच्या माणसाच्या हातात पतंग आहे. तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पण जेव्हा पतंगाची दोरी सुटली की तर पतंग कोणत्या गटारेत पडेल सांगता येत नाही.

आम्हा पुढाऱ्यांची अवस्था अशी आहे. तुमच्या हातात दोर नीट आहे, म्हणून आमचा खेळ सुरू आहे. तुम्ही दोरा सोडला तर आम्ही कुठे जाऊन पडू सांगता येत नाही. त्याचीच जाणीव ठेवून आम्ही मंत्रिमंडळात काम करत असतो, असं ते म्हणाले.

राष्ट्रपतींना विनंती
यावेळी त्यांनी बैलांच्या शर्यतीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. बैलगाडा शर्यती व्हावी ही भाजपची सुरुवातीपासून भूमिका आहे. बैलांच्या शर्यतीबाबत आम्ही राष्ट्रपतीना विनंती केली आहे. 12 महिने शेतकरी बैलाला जीव लावतात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली पाहिजे, असं ते म्हणाले.

आघाडीवर टीका
तामिळनाडूच्या आरक्षणाला स्थगिती मिळत नाही. पण आमच्या आरक्षणला स्थगिती मिळते याचा अर्थ हे सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं आहे, अशी टीकाही त्यांनी आघाडी सरकारवर केली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!