Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील या पतसंस्थेत 3 कोटींचा अपहार; 3 जणांवर गुन्हा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सीना परिसर नागरी सहकारी पतसंस्थेत तीन कोटी एकवीस लाखांचा अपहार झाला आहे. तीन कोटी एकवीस लाखांचा अपहारदिलेल्या फिर्यादीनुसार, संस्थेत १९९६ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान इक्बाल जमादार शेख हे व्यवस्थापक होते.

व्यवस्थापक म्हणून सोने तारण कर्ज लॉकरच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. दत्तात्रय ऊर्फ आबा प्रकाश सुतार हे सन २००० पासून क्लार्क या पदावर कार्यरत होते. संस्थेच्या सर्व कामकाजाची जबाबदारी या दोघांवर होती. तसेच लेखापरीक्षणासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच होती.

याबाबत व्यवस्थापक इक्बाल जमादार शेख, सचिव दत्तात्रय ऊर्फ आबा प्रकाश सुतार व कर्जदार इंद्रकुमार शंकरराव धोंगडे (सर्व रा. मिरजगाव) यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष एकनाथ खेतमाळीस यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत सांगितले, की इक्बाल शेख हयात नाहीत.

 गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहे.सोने तारणच्या ११ बॅगा कर्ज न भरताच नेल्याव्यवस्थापक शेख यांच्या निधनानंतर किरण पाराजी काळे यांच्याकडे व्यवस्थापकपदाचा कार्यभार देताना हा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा बँकेत असलेल्या पाच लॉकरमध्ये सोने तारणच्या काही बॅगा कमी आढळल्या.

तसेच लेखापरीक्षण अहवाल १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च ३०२१ पर्यंतच्या, ३० जुलै २०२१ रोजी लेखापरीक्षक टी. वाय. कोरे यांनी जाहीर केलेल्या अहवालात संस्थेचे कर्जदार इंद्रकुमार धोंगडे यांच्याकडे एक कोटी कर्ज असून, लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या ११ बॅगा मिळून आल्या नाहीत. याबाबत धोंगडे यांना संस्थेने गुन्हा दाखल करण्याचे

सांगितल्यावर त्यांनी व्यवस्थापक शेख व क्लार्क सुतार यांच्याशी मैत्री असल्याने सोने असलेल्या बॅगा घेऊन गेलो, असे सांगितले. त्याने या कर्जापोटी २२ मार्च ते २० जुलै २०२१पर्यंत संस्थेत एकोणचाळीस लाख रुपये रक्कमही भरली. मात्र, नंतर त्याने उर्वरित रक्कम भरण्यास नकार दिला.

याबाबत फिर्यादीवरून वरील तिघांच्या विरोधात तीन कोटी एकवीस लाख चार हजार नऊशे दोन रुपयांच्या अपहारप्रकरणी कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!