Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात चालत्या कारने घेतला पेट :उप सरपंचासह त्याचा मित्र त्यामध्ये…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शिबलापूर – संगमनेर मार्गावर ‘ द बर्निंग कारचा ’ थरार गुरुवारी पाहायला मिळाला असून शिबलापूर ते गोसावी फाट्या दरम्यान फोर्ड कंपनीच्या चार चाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली आहे.

शिबलापूर – संगमनेर मार्गावर शिबलापूर ते गोसावी फाट्या दरम्यान चार चाकी फोर्ड कंपनीच्या (एम. एच. ०५ ए. जे. ७७१४) सुनिल मांढरे याच्यां मालकीच्या गाडीला गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी भर रस्त्यात चालत्या गाडीने अचानक पेट घेतला.

यामुळे ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली. मात्र प्रसंगावधान राखत आश्वी खुर्दचे उप सरपंच सुनिल तुकाराम मांढरे आणि त्याचे मित्र उमेश गाडे वेळीच त्यातून बाहेर पडले. त्यामुळे ते दोघेही सुखरुप बचावले आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नं केला. मात्र या दुर्घटनेत ती गाडी पूर्ण जळून खाक झाली असली तरी दैव बलवत्तर म्हणून सुनिल मांढरे व उमेश गाढे हे बाल – बाल बचावले आहेत.

ताज्या बातम्या

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...
error: Content is protected !!