Monday, October 25, 2021

राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. या टीकेनंतर संतप्त झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा बदनापुरात आली असून त्या यात्रेदरम्यान दानवे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. दानवे म्हणाले, एखाद्या देवाला आपण गोरे सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे?, असा प्रश्न दानवेंनी कार्यकर्त्यांना विचारला.

त्यावेळी सांड असे उत्तर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात दिले. त्यावर दानवे पुढे म्हणाले की, ते काय करते त्याला म्होरकी नसते, त्याला वेसण नसते. कुठे बांधायचे झाले तर त्याला ठिकाणाही नसतो. याचे कारण म्हणजे त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जाते आणि खाते.

शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या, खाऊद्या त्याला, ते तरी कुठे जाईल खायला. आणि खाऊन मग हा कसा लठ्ठ्या होतो.

पटोले आणि सत्तार यांनी दिले प्रत्युत्तर

अशा प्रकारची वक्तव्य करून त्यातून लोकांचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे. पण रिकामे पोट मनोरंजन घडवू शकत नाही. आज बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे. या सगळ्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी आता भाजपचे प्रयत्न सुरु आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!