Friday, October 22, 2021

ज्ञानेश्वर’ कामगार पतसंस्थेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याची अध्यक्ष अनिल शेवाळे यांनी दिली.

ज्ञानेश्वर कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे अध्यक्ष अनिल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली.त्यात सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप व 50 हजार रूपयांची कर्ज मर्यादा वाढीचा निर्णय घेण्यात आला.

मागील सभेचे इतिवृत्त व अहवाल वाचन सचिव सुरेश उगले यांनी केले. संस्था स्वभांडवली झाल्याने सभासदांनी समाधान व्यक्त करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच कर्जाचा व्याजदर कमी करण्याची मागणी केली. सभेत सभासद कर्ज मर्यादा 50 हजारने व तातडी कर्ज 10 हजाराने वाढविण्यात आल्याचे व व्याजदर कमी करण्याचा विचार करणार असल्याचे अध्यक्ष शेवाळे यांनी सांगितले. यावेळी विलास परदेशी, कारभारी गरड,कामगार संचालक सुखदेव फुलारी, भाऊसाहेब सामृत आदींनी विविध प्रश्न विचारून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

वार्षिक सभेतील निर्णयानुसार 36 लाख रुपये लाभांशाची रक्कम सभासदांच्या बँक खात्यात दि.17 ऑगस्ट रोजी जमा करण्यात आल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब लबडे यांनी दिली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!