Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग : पत्नीचा खून करत पतीचीही आत्महत्या; या गावातील घटना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने पश्चाताप म्हणुन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे आज शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मयताची नावे पत्नी लताबाई दशरथ दळे (वय 45) व पती दशरथ मन्सीराम दळे (वय 50) अशी आहेत.

याबाबत मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीचा खून केल्याने मयत दशरथ दळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी दशरथ दळे याने पश्चाताप म्हणुन आत्महत्या केल्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मयताचा मुलगा नवनाथ दशरथ दळे (वय 23) या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे कुटूंबासह राहतो व मजुरीकाम करुन माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. माझी आई लताबाई (वय 45 वर्षे) व वडील-दशरथ मन्सीराम दळे (वय 50 वर्षे) हे आमच्या घरासमोरच झोपडीत राहतात.

माझा लहान भाऊ संदीप दशरथ दळे याचे लग्न झालेले असल्याने तो त्याचे कुटंबासह माझ्याच घरात दुसर्‍या खोलीत राहतो. माझी लहान बहिण रोहिणी हिला चिखलठाण येथे दिलेली असल्याने ती सासरी राहत असते. माझे वडील दशरथ हे नेहमी दारु पित असतात व त्यामुळे ते बर्‍याच वेळा दारुचे नशेत आई सोबत व आमचे सोबत भांडण करुन शिवीगाळ करीत असत.

दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे जेवण करुन घरात असताना रात्रीचे अंदाजे 11.00 वाजे दरम्यान आई-वडीलांचे झोपडीत आपसात भांडण सुरु होते. त्यावेळी बाहेर पाऊस सुरु असल्याने व त्यांचे नेहमीचेच भांडण असल्याने आम्ही त्यांचेकडे दुर्लक्ष केले व झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी दि.20 ऑगस्ट वोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मी झोपेतुन उठलो. त्यावेळी माझा लहान भाऊ संदीप याने मला फोन करुन सांगितले की, तात्याने आपले घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला दोराने गळफास घेतलेला आहे. त्यावेळी मी तेथे जाऊन खात्री केली असता माझे वडील दशरथ मन्सीराम दळे (वय 50 वर्षे) हे झाडाला दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन लटकलेले दिसले.

त्यावेळी मी व भाऊ असे आम्ही घरी आईला उठवायला झोपडीत गेलो असता आई काहीएक हालचाल करत नव्हती. तिचे डोक्याला मार लागुन डोक्यातुन व नाकातुन रक्त येत होते. तेथे बाजुलाच लाकडी दांडा पडलेला होता. त्याला एका बाजुने रक्त लागलेले होते.

सदर घटनेबद्दल गावातील लोकांना माहिती झाल्यावर काही वेळाने पोलीस आल्यावर गावातील लोकांचे मदतीने आम्ही आई-वडीलांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकुन शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले.

या घटनेवरून आमची खात्री झाली की, माझ्या वडीलांनीच रात्रीचे वेळी दारुच्या नशेत आईला दांडक्याने डोक्यात मारहाण करुन जिवे ठार केले. त्यानंतर पश्चातापात होऊन वडील दशरथ मन्सीराम दळे यांनी स्वतः आमचे घराचे जवळच असणारे झाडाला दोराने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.

याप्रकरावरून वडीलांनी दारुच्या नशेत आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात मयत दशरथ मन्सीराम दळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर आपल्याकडून दारुच्या नशेत पत्नीचा खून झाल्याचे समजल्यावर दशरथ दळे याने घराजवळच असणार्‍या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!