Wednesday, October 27, 2021

इटलीच्या पाहुण्याचे बाभूळखेडेत कुतूहल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील बाभुळखेडे ह्या छोट्याशा खेडे गावी इटलीचे वॉल्टर बरेसल यांनी दादासाहेब कडू यांच्या घरी भेट दिली.

तालुक्यातील बाभुळखेडे येथील कडू कुटुंबीय गेली अनेक वर्षे झाली सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करत आहे.या बाबीची माहिती पुण्यातील एका व्यापाऱ्याने वॉल्टर बरसेल यांना सांगितली असता निसर्ग शेती व गोपालन याची सांगड भारतातील शेतकरी प्रत्यक्षात कशा पद्धतीने घालतात याचा अभ्यास करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने इटलीमधील शेती विषयावर अभ्यास करणारे वॉल्टर यांची नेमणूक केलेली आहे. ते सध्या नैसर्गिक शेती तज्ञ म्हणून काम पाहत असल्याचे त्यांनी सांगितले .भारतातील संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून तिला जगात शंभर टक्के जोड नाही असे त्यानी सांगितले. गुळाची निर्मिती करून आपल्या मातृभूमीची सेवा करत असलेले माधव गुळाचे व्यवस्थापक शिवराज कडू हे देशसेवा करतात आणि हीच देशाची सेवा आहे असे वॉल्टर म्हणाले.

दादासाहेब कडू यांनी सांगितले की, पूर्वीपासून आमचे कुटुंब गाईचे पूजन करणारे आहेत. पुढील पिढीने त्याला अत्याधुनिक पद्धतीने जगासमोर मांडुन गो-सेवे बरोबरच उत्पन्नाचे साधन देखील निर्माण केले आणि शंभर टक्के नैसर्गिक गुळ महाराष्ट्रात पोहोचविला याचा मला अभिमान वाटतो. या कामांमध्ये माझे तिन्ही मुलं आणि महिला व्यस्त असतात.

वॉल्टर यांचेशी बोलताना मुख्य अडचण होती ती म्हणजे द्विभाषिकाची गरज. त्यासाठी गावातील दत्तात्रय विधाटे व अँड.पांडुरंग औताडे यांनी ती भूमिका पार पाडली. वॉल्टर यांनी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात नैसर्गिक शेती कशी पिकवली जाते याची माहिती करून घेतली. संपूर्ण गावात इटलीचा माणूस म्हणून कुतूहल निर्माण झाले होते. या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत गावातील नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!