Saturday, October 23, 2021

ध्येयवेड्या जलदूत प्रणाली चिकटेचा 10 हजार किमीचा थक्क करणारा सायकल प्रवास

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर/सुखदेव फुलारी

कोण किती ध्येयवेडे असते, त्याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही… त्यात पैसे कमवण्यासाठी अनेकजण ध्येयासाठी झपाटून झोकून देतात… पण समाजासाठी पर्यावरणासाठी असे झोकून देणारे दुर्मिळच… त्यात युवतीचा अतिदुर्मिळ… पण अशीच एक ध्येयवेडी सध्या नगर जिल्ह्याचा प्रवास करत आहे. तीऑक्टोबर 2020 मध्ये घराबाहेर पडली आहे, त्याला 10 महिने पूर्ण झाले आहे. आश्चर्य म्हणजे 10 हजार 500 किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवरुन एकटीने केला आहे.तो ही केवळ जल-पर्यावरण संवर्धनाची पंचसूत्री स्वतःमध्ये अन् समाजामध्ये रुजवण्यासाठी.

यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट गावची 21 वर्षीय प्रणाली चिकटे असे या ध्येयवेड्या तरुणीचे नाव आहे.ती संपूर्ण महाराष्ट्राला जलसंवर्धन,पर्यावरण रक्षण व महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आहे. सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणी आपल्या सायकल प्रवासा दरम्यान इंधन बचत बरोबर पर्यावरण वाचवाचा संदेश देत आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सायकलिंग गरजेचेच आहे, असे मत आपल्या प्रवासा दरम्यान तिने व्यक्त केले. सायकल प्रवासामुळे इंधन बचत, पर्यावरण रक्षण आणि आरोग्य असे अनेक फायदे आहेत, हे ती समाजाला पटवून देत आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र ती सायकलवरुन सवारी करत आहे.

*ही पंचसूत्री पाळा-प्रणाली चिकटे*

• आरोग्यासाठी, वायू, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ती कामे सायकलने करू या.

• प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळ्यात. सोबत कापडी पिशवी, पाण्याची बॉटल ठेवूया.

• परिसरात झाडे लावूया, जगवू या. अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करूया.

• आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवूयात आणि आपले आरोग्य सुधारूया.

• ‘पाणी बचत व पाणी जिरवा’ या कामात सहभाग घेऊ या

‘पर्यावरण संवर्धन सायकल यात्री म्हणून सध्या तिचे ओळख निर्माण झाली आहे. या प्रवासा दरम्यान पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण जनजागृती आणि लोकल परिस्थितीचा अभ्यास हा तिचा महत्त्वाचा हेतू आहे. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण बदल, ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांना भेटणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहचविणे शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत स्थानिक परिस्थिती समजून घेणे आदी बाबींसाठी हा प्रवास तिने सुरु ठेवला आहे.

प्रणाली सांगते की, मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील असून, प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे. कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नाही. कोणी सोबत नाही की, कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वःजबाबदारीचा असून, लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सह्योग सुद्धा लोकच करतात. प्रवास करत 10 महिने काही दिवस, त्यात तब्बल 10 हजार 500 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. कोरोनाच्या काळात सुद्धा सहकार्य मिळत आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य करत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे. माझ्या या सायकल प्रवासात लोकांना पंचसूत्री सांगत आहेत. ज्याचा संकल्प मी स्वतः घेतला असून, प्रत्येकाने त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे काळाची गरज आहे.

प्रणाली नगर शहरामध्ये दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी तिचे स्वागत केले.तिची विचारपूस करून तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.महानगरपालिकेत महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रणालीचे स्वागत केले.
सिंचन भवनात मुळा पाटबंधारे विभागाचे वतीने कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी प्रणालीचे स्वागत केले.यावेळी जलसाक्षरता समितीचे सदस्य सचिव प्रकाश अकोलकर, जलमित्र सुखदेव फुलारी, डॉ.प्रशांत शिंदे,हरियालीचे सुरेश खामकर यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...
error: Content is protected !!