Wednesday, October 27, 2021

भेंडा येथील रस्ता अपघातात एक गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा रस्त्यावर भेंडा बुद्रुक गावानजीक मळीनाल्या जवळ झालेल्या रस्ता अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील दोन तरुण गंभीर रित्या जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आज दि.20 ऑगस्ट रोजी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान भेंडा येथे मळीनाल्या नजीक रस्त्याने जात असलेल्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील नितीन सोमनाथ पुंड (वय 28 वर्षे) व रमेश ज्ञानदेव पुंड (वय 28 वर्षे) हे दोघे सख्खे चुलत भाऊ गंभीर रित्या जखमी झालेत.108 रुग्णवाहिका बोलावून त्यांना इतर प्रवाशांनी नेवासा फाट्यावरील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.जखमी पैकी नितीन पुंड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

 

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!