Monday, October 18, 2021

राज्यात आज कोरोनाच्या आकडेवारीत वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही रोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे.

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होणाऱ्यांपेक्षा कमी आढळून येत आहे, शिवाय रोज मोठ्याप्रमाणावर रूग्ण देखील करोनातून बरे होत आहेत. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३८४ रूग्ण करोनातून बरे झाले,तर ४ हजार ३६५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

याशिवाय, १०५ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे.

तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१९,२१,७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,१५,९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,२२,२२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.

तर २,७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५५,४५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!