Monday, October 25, 2021

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीवर वडिलांकडूनच अत्याचार, म्हणाली….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस. या शोमधले स्पर्धक कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या शोमधील स्पर्धक अभिनेत्री उर्फी जावेद एका विधानानंतर खूप चर्चेत आली आहे.

एका मुलाखती दरम्यान उर्फी म्हणाली की, ”जेव्हा तिचा एक फोटो अडल्ट साइटवर अपलोड केला गेला होता तेव्हा तिला कौटुंबिक पाठिंबा देखील मिळू शकला नाही. ती म्हणाली, त्यावेळी मला दोषी ठरवलं जात होतं आणि लोकांना वाटलं की, मी पोर्न स्टार आहे. उर्फीने एका मुलाखतीदरम्यान या गोष्टी सांगितल्या आहेत.

ती म्हणाली की, या घटनेनंतर माझ्या वडिलांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. नातेवाईकांना माझं बँक खातं तपासायचं होतं. जेणेकरून मी लपवलेले पैसे शोधता येतील”.
उर्फी जावेद पुढे म्हणाली की, ”त्यावेळी मी कॉलेजमध्ये होते. मी फक्त अकरावीत होते. हा टप्पा माझ्यासाठी सर्वात कठीण होता, कारण माझे कुटुंबातील सदस्यही मला साथ देत नव्हते. अशावेळी कुटुंबानेही मला दोष दिला.

ती म्हणाली की, लोक माझ्याबद्दल अशा गलिच्छ गोष्टी बोलत असत की, मला माझं नावही आठवत नव्हतं. कोणत्याही मुलीला माझ्याबरोबर जाण्याची परवानगी नव्हती.  माझ्या वडिलांनी 2 वर्षांपासून माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या अनुभवानंतर माझा स्वतःवर विश्वास बसला. जेव्हा माझे वडील मला दोष देत असत, तेव्हा मी काहीच बोलले नाही.

हा छळ सहन करण्याशिवाय मला काहीच करता आलं नाही”.
ती म्हणाली की, ”मला नेहमी सांगितलं जात होतं की, मुलींना आवाज उठवता येत नाही, फक्त पुरुषांना निर्णय घेण्याची परवानगी आहे. मला माहित नव्हतं की मला आवाज उठवता येत नाही, पण जेव्हा मी माझं घर सोडलं तेव्हा मला सर्वाइव करण्यासाठी बराच वेळ लागला. आता माझं व्यक्तिमत्व समोर येत आहे आणि मी थांबणार नाही.”

आधीच्या मुलाखतीत उर्फीने सांगितले होते की, घरातून पळून गेल्यानंतर तिला काही दिवस गार्डनमध्ये राहावं लागलं. ती म्हणाली, मी माझ्या भाऊ- बहिणींना सोडून अन्य दोन बहिंणासोबत घरातून पळून गेले आणि एक आठवडा दिल्लीच्या एका पार्कमध्ये राहिले. मग आम्ही तिघंही नोकरी शोधू लागलो आणि मला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी

मिळाली. माझ्या वडिलांनी त्यावेळी दुसरं लग्न केलं होतं आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. मी फक्त प्रार्थना करते की माझ्या बाबतीत जे घडले ते इतर कोणत्याही मुलीसोबत घडू नये.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!