Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील या’ नगरपालिका व नगर पंचायत निवडणूकाची लवकरच रणधुमाळी ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यातील बहुतांश नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका लांबणीवर पडतील अशी शंका असतानाच निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे राज्यात निवडणूक रणधूमाळीला लवकरच सुरुवात होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्यातील ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मुदत संपत आहे, त्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नगरपरिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून वार्ड रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. हा आराखडा तयार करीत असताना भौगोलिक बदल, नद्या, नाले नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात घ्यावे नगरपरिषद नगरपंचायत अधिसूचनेद्वारे त्याचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावेत.

आराखडा तयार करण्याची कार्यवाही तात्काळ म्हणजे 23 ऑगस्ट रोजी सुरू करावी असे निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कच्चा आराखडा तयार केल्यानंतर तात्काळ तो आराखडा निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तयार केलेला कच्चा आराखड्याबाबतची गोपनीयता पाळण्यात यावी. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता वरील मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन हा आराखडा तयार करावा असेही यात नमूद करण्यात आले आहे.

आराखड्याबाबत काही चुका झाल्यास व संबंधित नागरिक न्यायालयामध्ये गेल्यास कच्चा आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. संबंधित अधिकाऱ्याला त्याचे उत्तर न्यायालयामध्ये द्यावे लागेल असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातील नगर पालिका :

अकोले

शेवगाव

रहाता

कोपरगाव

पाथर्डी

राहुरी

श्रीरामपूर

संगमनेर

देवळाली प्रवरा

नगर पंचायत –

शिर्डी

जामखेड

कर्जत

पारनेर

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!