Monday, October 25, 2021

संभाजीराजेंना तातडीने अटक करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना पसरला असताना सरकारने कोणताही मौर्चा, आंदोलन, सभा असे कार्यक्रम घेण्यास बंदी घातली होती. मात्र, या काळात खासदार संभाजीराजे यांनी न्यायालयाने असंविधानिक ठरवलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात नांदेडमध्ये शुक्रवारी मोर्चा काढला.

संभाजीराजे यांनी हे गुन्हेगारी कृत्य केले. तेव्हा त्यांना अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी नांदेडमध्ये होते. काढलेल्या मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी झाले होते.

हा मोर्चा काढून संभाजी राजे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. उच्च न्यायालयाने कोरोना काळात मोर्चे काढू नये, असे म्हटले आहे. तरीही त्यांनी मोर्चा काढला.ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तेव्हा संभाजीराजे यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर नागरिक निदर्शने करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्यांना पंधरा पंधरा दिवस तुरुंगात ठेवले जाते. संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडचे पालकमंत्री आहेत.

त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना याबाबत निर्देश द्यायला हवेत. मोर्चा काढू द्यायल नको होता. मात्र, तसे झाले नाही. मोर्चाला झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत अन्यथा पुढील परिस्थितीला ते जबाबदार राहतील, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.

संभाजीराजे यांनी यापूर्वी सुद्धा नक्षलवाद्यांच्या संदर्भाने मराठा आरक्षणाच्या समर्थनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्या अनुशंगाने सुद्धा चौकशी होणे फार गरजेचे आहे. तातडीने त्यांच्या मुसक्या दावा, त्यांना अटक करून कारवाई करा, असेही वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!