Sunday, October 24, 2021

नगर जिल्ह्यात  १० लाखाच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न अन् पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: जामखेडमध्ये १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून अपहरण केल्याची घटना घडली आहे मात्र आरोपींचा हा प्रयत्न फसला असून जामखेड पोलिसांनी दोन तासांच्या आत आरोपींना गजाआड केले आहे.

दोन आरोपींना अटक केली असून एक मात्र फरार झाला आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी घरमालक कृष्णा अशोक साळुंके (वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा. बीड रोड जामखेड) हा दि. १९ रोजी रात्री आपल्या घरी झोपलेले असताना

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी वाजवला. या वेळी दिड वर्षापासुन फिर्यादीच्या घरातील रुम भाड्याने राहणाऱ्या आरोपी योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला. यानंतर दोन आरोपींनी माझ्या घरात येऊन माझे हात पाय बांधुन,

तोंडाला रूमाल बांधुन व गळ्याला चाकु लावून (एम एच १२ एफ के ३८९७) या चारचाकी वाहनात मागच्या सिटवर बसवुन म्हणाले की, कृष्णा याने १० लाख रूपये दिले नाही तर त्यास ठार मारून टाकू. हे सर्व फिर्यादी कृष्णा याने गाडीत ऐकले होते.

यानंतर फिर्यादी यांनी  कसेबसे गाडीतुन आपली सुटका करुन घेत बीड रोडवरील आपल्या घराजवळ आरडाओरड केली. मात्र तरी देखील भाड्याने रहात आसलेल्या आरोपी योगेश शिंदे यांने फिर्यादी घरमालकास दम दिला की, तु गाडीत येऊन बस नाहीतर तुझ्या आईला ठार मारु.

या नंतर शेजारी रहाणारे लोक धावत बाहेर आले. त्यामुळे आरोपी योगेश शिंदे (रा. सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड) व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहुन पळुन गेले. या प्रकरणी फिर्यादी कृष्णा साळुंके याने दिलेल्या फिर्यादीवरून  तीन आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना लपुन बसलेल्या नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातुन अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!