Friday, October 22, 2021

असा घडला नगर जिल्ह्यातील त्या 24 वर्षांचा तरूण हनीट्रॅपचा बळी अन् घेतला जगाचा निरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के (वय 24 ) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मात्र ही आत्महत्या हनीट्रॅप प्रकरणातून झाली असल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे.

सुमित शिर्के या तरुणाला संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील एका मुलीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. सहा महिन्यांपूर्वी या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. काही दिवसांनी या प्रेमाची चाहूल मुलीच्या आईला लागली. मात्र या मुलीच्या आईने आपल्या मुलीला व सुमित शिर्के यांस समज दिली नाही.

उलट आपल्या हाती बकरा लागला आहे असे समजून तिने सुमित शिर्के या तरुणाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. तू पैसे दिले नाहीतर तुझ्या घरी येऊन राडा करेल अन् तुला कायमचे आत बसवेल,अशी धमकी तिने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या सुमितने आपल्याकडे येतील त्या पद्धतीने मुलीच्या आईस पैसे देण्यास सुरुवात केली.

मात्र कोरोना काळात हातची नोकरी गेल्याने सुमितकडे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या मोठ्या भावाकडून अन् आईकडून वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेतले व संबंधित मुलीच्या आईला पोहोच केले. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे सुमितचे अन् संबंधित मुलीचे पटत नव्हते. त्यांचे अनेकदा खटके उडायला लागले.

मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही, असे सांगून सुमितने तिला व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ब्लॉक करून टाकले. मात्र ती मुलगी सुमितला सोडण्यास काही तयार नव्हती. ती घरातील इतर सदस्यांच्या मोबाईलवरून कॉल करून त्यास सतत मानसिक त्रास द्यायची. या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुमित हा मोठ्या मानसिक तणावाखाली होता.

आपल्याला पूर्णतः या कुटुंबाने जेरीस आणले असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यातच मुलीच्या आईकडून कायमच होणारी पैशाची मागणी यामुळे सुमित आपल्या जीवाला कंटाळला होता. हजार दोन हजार रुपये ठीक होती, मात्र आता पैसे मागण्याची त्यांची मजल ही खूपच वाढत गेली होती.

50 हजार रुपये आणून दे, नाहीतर…सोमवार (ता.9) सुमित हा नेहमीप्रमाणे आपल्या घरात बसला असता त्यास मुलीच्या आईचा फोन आला, मला तू दुपारपर्यंत 50 हजार रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या घरी येऊन मी आज राडाच करते, तसेच तुझ्यावर पोलीस ठाण्यात जाऊन कम्प्लेट करते, अशी धमकी दिली. त्यामुळे सुमित हा त्या दिवशी खूपच नैराश्यात होता.

मुलीच्या आईला 50 हजार रुपये देण्याची आपली परिस्थिती नसून दरवेळी भाऊ व आईकडून पैसे कसे मागायचे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा होता. त्यातच मुलीच्या आईबरोबर मुलीने ही त्यास फोन करून 50 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. मला तू जर 50 हजार रुपये पाठवून दिले नाहीतर मी

 घरा शेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करणार आहे,असा इशारा तिने सुमित याला दिला. त्यातच काही वेळातच तिने आपल्या घराशेजारील विहिरीचे फोटो सुमितच्या मोबाईलवर पाठविले. त्यामुळे सुमित याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला,व घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी मयत सुमितच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता, संबंधित मुलीच्या आईचे आलेले फोन तसेच त्या मुलीने त्याच्यासोबत व्हाट्सअपवर केलेली चॅटिंग मिळून आली आहे.

त्यामुळे मयत सुमित शिर्के याच्या मृत्यूला प्रेमिका व तिची आईच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लवकरच या दोघींवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तरुणांना भुलवून वाम मार्गाला लावणाऱ्या संगमनेर येथील महिलांवर लवकरच अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!