Wednesday, October 27, 2021

2 तासाचे 2 लाख! मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक बाब उघड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:पॉर्न केस प्रकरण मावळत असताना सेक्स रॅकेट संदर्भातील एक मोठी बातमी शुक्रवारी समोर आली. मुंबईच्या क्राइम ब्रान्चने एक टॉप मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला जुहूमधील फाइव्ह स्टार हॉटेलमधून पकडल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मात्र तपासानंतर या दोघांना अटक केलं नाही, तर रेस्क्यू केल्याचं सांगितलं. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालाही अटक करण्यात आली आहे.सीनियर इंस्पेक्टर मनीष श्रीधनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा खान हिने चौकशीदरम्यान सांगितलं की,

हे सेक्स रॅकेट ती गेल्या अनेक वर्षांपासून चालवत होती. पोलिसांना इशा खानबद्दल टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी टीमला जुहू येथील एका हॉटेलमध्ये धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती.इशा खानची माहिती मिळताच तातडीने क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला.

यामध्ये त्याने टॉप मॉडल्सची मागणी केली. यानंतर इशा खानने त्यांना अनेक फोटो व्हाॉट्सअॅप केले. क्राइम ब्रान्चने यापैकी दोन फोटो सिलेक्ट केले. यामधील एक अभिनेत्री अनेक जाहिरातीत झळकली आहे तर दुसरीने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.

 

इशा खानने एका तरुणीसाठी दोन तासाचे दोन लाख रुपये असल्याचं सांगितलं. या दोन लाख रुपयात खानला 50 हजार रुपये दिले जातात. तर तरुणींना दीड लाखांची रक्कम दिल्याचं सांगितलं जात आहे.

खोटे ग्राहक बनून पोलीस अधिकाऱ्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये एक रुम बुक केला. गुरुवारी रात्री महिला दलाल, मॉडेल आणि अभिनेत्री जशा हॉटेलमध्ये पोहोचल्या. क्राइम ब्रान्चच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं.

 

मॉडल आणि टीवी अभिनेत्रीने सांगितलं की, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे त्या या व्यवसायत आल्या.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!