Friday, October 22, 2021

शाळा सुरू करण्याबाबत अजित पवारांचे मोठे विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याच्या सूचना ‘टास्क फोर्स’ने केल्या आहेत. मात्र, अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे.

याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिली. राज्य सरकारने मध्यंतरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन दिवसाच हा निर्णय मागे घेण्यात आला. याबाबत पवार यांचा विचारले असता, ते म्हणाले, ‘‘शाळा सुरू करण्याबाबत अनेक मत प्रवाह आहेत.

तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘टास्क फोर्स’ने दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हा निर्णय दिवाळीनंतरच होणार आहे.’महाविद्यालये सुरू करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. काही संस्थांचालक आणि पालकांची देखील मागणी आहे.

त्यामुळे अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच शिक्षक आणि अन्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण पूर्ण झाले आहे. अशा महाविद्यालयांना सर्व नियम पाळून परवानगी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बैलगाडा शर्यतीचा प्रश्‍न राज्य सरकारच्या अखत्यारित असता, तर तो आम्ही सोडविला असता,’ असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले. राज्यपालांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी याबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!