Wednesday, October 27, 2021

ज्योती देवरे क्लिप ऑडिओ प्रकरण:आता या महिला नेत्यांची एन्ट्री

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर मधील एका डॅशिंग महिला अधिकाऱ्याची सुसाईड टेप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर क्लिप तहसीलदार ज्योती देवरे यांची असल्याची आणि सदर क्लिपचा रोख आ. लंके यांच्याकडे होता असे म्हटले जाते.आमदार नीलेश लंके यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले स्पष्ट मत मांडले आहे.

परंतु आता यात तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पाठीशी अनेक पक्ष खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र आहे.भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ह्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. त्या म्हणाल्या की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप गंभीर आहे.

त्यांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी. त्यांची दीपाली चव्हाण होता कामा नये, जिवंतपणीच देवरे यांना न्याय मिळावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.देवरे जिवंत असेपर्यंत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांची दीपाली चव्हाण होता कामा नये. देवरे यांनी लिहिलेली हकीगत योग्यच आहे.

एखादी महिला जर चांगले काम करून आपल्या पुढे जात असेल तर नक्कीच तिला दीड शहाणी, आगाऊ असे म्हटले जाते. देवरे यांना ज्या लोकप्रतिनिधीने त्रास दिला आहे, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.मात्र ही चौकशी जर लोकप्रतिनिधी लावणार असतील तर ती कधीच नि:पक्षपातीपणे होणार नाही.

देवरे यांना न्याय द्यायचाच असेल तर त्या जिवंत असेपर्यंत द्यावा, अशी भूमाता ब्रिगेडची मागणी आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.त्यानंतर मनसे देखील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन

 याप्रकरणी चौकशीची मागणी केली व आमचा पक्ष देवरे यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आता माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पात्र लिहून याबाबत विचार करण्यास सांगितले आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!