Monday, October 25, 2021

पारनेर पाठोपाठ या तालुक्यातही लोकप्रतिनिधीकडून महिला कर्मचार्‍याच्या सोबत घडला हा प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात तहसिलदार ज्योती देवरे यांनी सुसाईड नोट करुन ठेवली आहे. तेथील आमदार निलेश लंके यांच्या त्रासाला आपण कंटाळलो असल्याचे त्यांनी मांडले आहे.

त्या पाठोपाठ आता अकोले तालुक्यातील राजूर परिसरात पिंपळदरा वाडी येथे देखील अंगणवाडी सेविकेला एक ग्रामपंचायत सदस्य मानसिक त्रास देऊन मारहाण करतो. इतकेच काय.! त्याची बहिन सरपंच असताना हाच तिच्या नावे सह्या करतो. यांनी गरोदर माता, सत्नदा माता, अमृत आहार या योजनेचे पैसे दिले नाही.

शेवटी तक्रारदार चहाबाई भांगरे यांनी स्वत:चे मंगळसुत्र गहाण ठेऊन 20 हजार रुपये घेऊन ही योजना चालु ठेवली आहे. त्यामुळे, संबंधित महिलेने ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भगवंत भांगरे यांच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहाबाई पांडुरंग भांगरे (पिंपळदरावाडी) ही महिला आंगणवाडी सेविका आहे.

तर याच ग्रामपंचायतीत साहेबराव भगवंता भांगरे हा तेथे सदस्य आहे. जेव्हा साहेबराव याने चहाबाई यांच्याकडे शेरे बुक मागितले तेव्हा त्या म्हणाल्या की, मी मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरते आहे. त्यामुळे, जरावेळ थांबा. तेव्हा साहेबराव हा स्वत: उठला आणि त्याने कपाट उचकण्यास सुरूवात केली.

त्यावेळी चहाबाई म्हणाल्या की, थांबा.! तुम्ही कपाट उचकू नका. असे म्हणताच साहेबराव भांगरे याला राग आला आणि त्याने चहाबाई भांगरे यांना अश्लिल शिवागाळ दमदाटी करीत त्यांच्या तोंडात चापट मारली. तुला येथे नोकरी करु देणार नाही असे म्हणत त्याने महिलेस दम दिला असे फिर्यादीत म्हटले आहे.

तर, स्थानिक काही व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव याची ग्रामपंचायतमध्ये चांगलीच दमबाजी चालते. त्याची बहिन येथे सरपंच असून त्या टाकेद येथे राहतात. जर चहाबाई यांनी चेकवर सह्या घ्यायच्या असतील तर त्यांना एकतर टाकेद येथे जावे लागते तर कधी हे बहाद्दर थेट स्वत:च सह्या हाणतात.

विशेष म्हणजे साहेबराव याने ते चेकबुक स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, गेल्या आठ महिन्यांपासून सगळा भोंगळा आणि मनमानी कारभार येथे सुरू आहे. यात उल्लेखनिय बाब अशी की, चहाबाई यांनी स्वत:च्या गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेऊन 20 हजार रुपये त्यापोटी घेतले आणि गरोदर माता, सत्नदा माता, अमृत आहार

 या योजना त्यांनी स्व-खर्चातून चालविल्या आहेत. म्हणजे 25 फेब्रुवारी 1927 रोजी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेऊन होस्टेलच्या मुलांना जेऊ घातले होते. त्यांचा आदर्श घेत चहाबाई यांनी सरकारच्या तीन योजना स्वत:चे मंगळसुत्र मोडून चालविल्या. तरी देखील त्यांच्या वाट्याला असा प्रकार यावा. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!