Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील घटना:पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपींचा उपचारादरम्यान मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला घेऊन

जात असताना भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने पोलीस स्टेशनला दिलेली आहे. रूक्सार बिराजदारच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

मात्र, आरोपी सादिकला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचारी शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी सादिकविरोधात 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सादिकचा मृत्यू झाला आहे.सादिकचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूरचे उपाधीक्षक संदीप मिटके, नगर शहर विभागाचे उपाधिक्षक विशाल ढुमे,

कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदी सादिकवर उपचार चालू असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!