Monday, October 25, 2021

पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत कालपासूनच पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. काल रात्री पावसाने अधिक जोर धरला असून आता पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात रात्रभर काही प्रमाणात हलका ते जोरदार पाऊस झाला. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात प्रचंड काळे ढग दिसून येत आहेत.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

21 ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

22 ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

23 ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे आणि आसपासच्या परिसरात काय स्थिती ?

21 ऑगस्ट – आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

22 ऑगस्ट – आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

23 ऑगस्ट – आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!