Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग: या ठिकाणी तरुणाच्या घरात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह ; तर्कवितर्कांना उधाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी येथे एका तरुणाच्या घरात अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात मृतदेह सापडल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृतदेह आढळला तेव्हा तो घरात नव्हताचितळी येथे आकाश खरात हा आपल्या आजीसोबत त्याच्या घरी रहात होता. त्याचे कुटुंबिय कामानिमित्त औरंगाबाद येथे रहात असून, त्याची आजीही काही दिवसांपूर्वी औरंगाबादला गेली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आकाश घरी एकटाच रहात होता.

दरम्यान त्याच घरात मुलीचा मृतदेह आढळुन आला तेव्हा आकाश घरात नव्हता. गावातील ग्रामस्थांनी घरात मृतदेह असल्याचे पोलीसांना दिली. त्यानुसार तालुका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सबंधीत मुलीचे कुटुंबीय व नातेवाईकांनी फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

गुरुवारी (ता. १९) सायंकाळी चितळी येथील आकाश राधू खरात (वय २५) नावाच्या तरुणाच्या घरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती येथील तालुका पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचासमक्ष मृतदेह खाली उतरविला.

त्यानंतर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. काल (शुक्रवारी) सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.दरम्यान काल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊ शकले नाही.

त्यामुळे मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!