Monday, October 25, 2021

मोठी बातमी! आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लीपसंबंधी चौकशी करण्यासाठी तीन महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला असून त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान देवरे आता सावरल्या असून पोलिसांचेही त्यांच्यावर लक्ष आहे. आपण यापुढे स्वत:साठी नाही, तर राज्यातील सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लढण्याचा निर्धार केल्याचे त्या सहकाऱ्यांशी बोलताना सांगत आहेत.

लोकप्रतिनिधींचा जाच आणि तक्रार करूनही वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगत आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लीप देवरे यांनी तयार केली होती. ती व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही खळबळ उडाली. विरोधी पक्षाकडून कारवाईची मागणी झाली.

त्यासोबतच राजपत्रित अधिकारी महासंघानेही सरकारला निवेदन देऊन चौकशी करून संबंधितांवर चौकशीची मागणी केली.राज्य महिला आयोगाने देवरे यांच्या क्लीपची दखल घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे.

त्यामध्ये उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार वैशाली आव्हाड यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल देणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही नोंद केली नाही. मात्र, दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस अधिकाऱ्यांनी देवरे यांच्याशी संवाद साधला आहे.

कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, यासंबंधी पोलिसांकरवी त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.मधल्या काळात देवरे यांच्यासंबंधी आलेल्या विविध तक्रारींची पूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात हे काम झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टलाच आपला अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.

काही तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने देवरे यांनी कामात कसूर केल्याचे आणि सेवा नियमांचा भंग केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा अहवाल बाहेर आला नव्हता. देवरे यांची क्लीप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी हा अहवालही बाहेर आला आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!