Friday, October 22, 2021

खा विखे म्हणाले राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगर जिल्ह्यातील या तालुक्यात नाही शिवसेनेचे नेते आमच्या सोबत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विकासाचे राजकारण करणे ही माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचीच प्रेरणा घेऊन आपण खासदार म्हणून विकासकामे मार्गी लावली असून वैचारीकता ठेउनच विकासाला पाठबळ देणाऱ्यांना बरोबर घेऊन आपण सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

कुरुंद (ता.पारनेर) येथे लसीकरण अभियानास भेट देऊन गाव तिथे लसीकरण करण्याच्या तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या अडीअडणी समजून घेतल्या, जास्तीत जास्त लसीकरण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानास भेट देऊन स्वस्त धान्य दुकानदारास वाटपा संदेर्भात योग्य त्या सूचना देऊन लाभार्थ्यांना धान्यचे वाटप करुन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७६१ राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी १० किलोमीटर रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण रस्त्याचा भुमिपुजन कार्यक्रम खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.२१ रोजी करण्यात आले. १६ कोटी २० लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे.

खासदार डॉ विखे पाटील यावेळी म्हणाले, १६ कोटी वीस लाख रुपयांचा हा रस्ता पुर्णपणे उकरुन तयार केला जाणार आहे.केंद्र सरकारने रस्त्यासाठी मोठा निधी दिला आहे. नगरचा बायपास रस्ता एक हजार कोटीचा आहे. कामाची गुणप्रत कशी आहे.याची चर्चा होत असली तरी रस्ता चांगला झाला पाहिजे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

महाविकास आघाडी राज्यात असली तरी तालुक्यात नाही.आज शिवसेनेचे नेते व्यासपीठावर आहेत.आमची वैचारिकता आहे म्हणून आम्ही एकत्र आहे. लसिकरण करताना गावात जाऊन लसिकरण केले पाहिजे.ही प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!