Monday, October 18, 2021

288 पैकी आमदार निलेश लंके एकमेव “बच्चन – इंदुरीकर महाराज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाकाळात एकीकडे सख्खे नातेवाईक दूर जात असताना गरजू रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे पारनेरचे आमदार म्हणजे राज्यातील 288 आमदारांपैकी एकमेव “अमिताभ बच्चन” आहेत, असं कीर्तनकार,’ समाजप्रबोधनकार’ निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी म्हटले आहे.

काल (20 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजता आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या पारनेर येथील ‘श्री शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर’ या कोविड सेंटरमध्ये समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यावर कोरोना संकट आल्यानंतर राज्यातील इतर लोकप्रतिनिधी केवळ गप्पा मारण्यात व्यस्त होते, मात्र आमदार लंके यांनी थेट कृती करत हजारो कोरोना रुग्ण बरे करून घरी पाठवले. दरम्यान चांगले काम करणाऱ्यांना त्रास देखील असतो. ज्या बोरीला जास्त बोरं असतात तिलाच दगडांचा मारा सहन करावा लागतो असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

दरम्यान नेहमीप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सुरू असताना मोबाईल चित्रीकरण करणाऱ्यांना भर किर्तनात खाली बसवले. मागील काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांची एक वादग्रस्त वक्तव्य केलेली क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती, हे प्रकरण थेट न्यायालयात गेलं आहे. तेंव्हापासून इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात चित्रीकरणावर जवळपास मज्जावच केला आहे.

दरम्यान आमदार लंके यांचे कौतुक करताना, “चांगल्याला चांगलं म्हटले पाहिजे मला कुठं त्यांच्याकडे तिकीट मागायचे आहे?” असं सांगत असतांना त्यांनी राजकिय व्यासपीठावर गेल्यानंतर काय काय त्रास सहन करावा याची आठवून करून दिली, वास्तविक मी पूरग्रस्तांना 1 लाख रुपयांची मदत घेऊन ‘त्या’ व्यासपीठावर गेलो होतो.

मात्र माध्यमांनी त्याचा वेगळाच अर्थ काढल्याचं म्हणत त्यांनी माध्यमांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!